अत्यंत थकायला झालं आहे. रात्रभर कथेचे विचार, मागे पडलेल्या अनुवादाचे विचार डोक्यात होते, अधून मधून झोप येत होती त्यातून जाग आली की तेच विचार अजूनही असत. लेखक असणं ही फार विचित्र, कष्टमय गोष्ट आहे असं रस्किन म्हणतो त्यात काहीच चुकीचं नाही. मैत्रिणी, नातेवाईक, इतर सोशल कार्यक्रम हे सगळं मागच्या रांगेत टाकून प्रायोरिटी दिलेल्या लेखनातून इतकी मानसिक अस्वस्थता वाट्याला येत असूनही सकाळी पहिला विचार डोक्यात आला तोच आज कथा पूर्ण होईल का? त्या विचारानेच थकायला झालं. डाएट सुद्धा मागे पडलं आहे, सतत चहा आणि जेवण्याच्या टाळलेल्या वेळा त्यामुळे अजून काय होणारे. मग सगळं नीट आठवलं, जर्नल मधलं habit ट्रॅकिंग चं पान कितीही लाज वाटत असली तरी उघडलं. मग बेसिल, लेमनग्रास घालून बिनसाखरेचा चहा केला. स्वयंपाक, ब्रेकफास्ट आवरला, स्वयंपाकघर नीट आवरलं, मागवलेले मसाले, कसलं कसलं सामान नीट लावलं, पन्ह्याच्या कैऱ्या उकडून टाकल्या होत्या फ्रीजमध्ये त्या बाहेर काढला, ताक केलं भरपूर. गाणी लावली होतीच. मग आता बाहेर येऊन ब्लॉग पोस्ट टाकलं, तेव्हा जरा बरं वाटलं. अंधारे पॅसेज येतात ते पार करणं गरजेच आहे हे पुन्हा समजावलं. ...
Posts
Showing posts from March, 2021
“का?”
- Get link
- X
- Other Apps
आपण जे करत आहोत ते का करत आहोत असा एक विचार प्रोसेस जर्नलिंग करताना सतत स्वत:ला विचारायला लागतो कारण त्याशिवाय त्या कामा मागचं लॉजिक एक्स्प्लेन होत नाही. लार्जर थीममधे हा विचार मनात रेंगाळत राहिला. एक्झिस्टेन्शियल थिंकिंग म्हणता येईल त्याला. आत्ता जे करत आहे लिहिण्याशिवाय, त्यातलं बरंचसं लॉकडाऊनमधे सुरु झालं. लॉकडाऊन नसता तर ते अजून जरा उशीरा करायला लागले असते. खरं तर हे खूप आधी सुरु करायला हवं होतं. आधी त्याची गरज लागली नाही का? चित्रांवर लिहिताना, आपणही चित्र काढणं, झाडं वाढवण्याचे छंद जोपासणे यातून निर्मितीच्या आनंदापेक्षा नेमकं काय अधिक मिळत आहे मला? मुळात ते मिळावं हा हेतूच नसेल तर काय आणि का हा प्रश्न फ़िजुल आहे. जगण्याचे प्रयोग आहेत हे फ़क्त. मी याचा विचार करते ते फ़क्त प्रोसेसमागचे लॉजिक क्लिअर असावं म्हणून. मी जगण्याचे प्रयोग ब्लॉगवर या ज्या पोस्ट्स टाकत रहाते, त्यातून मला पूर्ण एका वर्षाचा डेटा आर्काइव्ह करायचा आहे. का? तर त्याकरता काही प्लॅन्स डोक्यात आहेत, पण ते पुढच्या वर्षाकरता, मे बी २०२२२ करता. स्विटी जोशीचं प्रदर्शन बघायला गेले होते, तेव्हा तिच्या कामाबद्दल बोलताना अपरि...
लिहीत नसतानाच लिहिणं
- Get link
- X
- Other Apps
रोज रात्री नाईट जर्नलमध्ये दिवसभराबद्दल लिहिताना आज मनासारखं लिहून झालं हे वाक्य फार फार क्वचित लिहिलं जातं असं माझ्या लक्षात आलं. जे लिहायचं आहे ते अजिबातच लिहिलं नाही, लिहिण्याचा वेळ इतर गोष्टीतच घालवला अशी वाक्य जास्त वेळा दिसायला लागली तेव्हा मी या इतर गोष्टी कोणत्या त्याचा एक ट्रॅक ठेवला. म्हणजे काय करते नेमकं मी जेव्हा लिहीत नसते? हे मी नीट नोंदवलं. फेसबुकवर नसतानाची ही गोष्ट. फेसबुकवर असताना वेळ कुठे गेला सगळ्यात जास्त हे तपासायचीही गरज नसते. पण आता होती. तेव्हा लक्षात आलं की लिहायची चालढकल करताना मी रिसर्च करता मॅक्सिमम सर्फिंग करत रहाते, एकातून दुसरं, ही लिंक, ती साईट असं. मग इतरांनी काय लिहिलं ते वाचत राहाते. सहज कुतूहल त्यामागे जास्त. काही वेळा सिनेमा, युट्यूब व्हिडीओ किंवा सिरीज कॅच-अप करते, किंवा लोळते आणि खाते. एफएम चॅनेल बदलत राहते, चहा करते. रिसर्च, इतर आर्टिकल्स वाचणे या दोन गोष्टी सोडल्या तर बाकी फालतू आहे, त्या थांबल्या तर दिवसाच्या शेवटी लिहिणं झालं नाही तरी गिल्ट येणार नाही असं काहीतरी करायला हवं असं लक्षात आलं. मग मी 3 गोष्टी केल्या. माझं आयडिया जर्नल अगदी हा...
दोआब दिल
- Get link
- X
- Other Apps
सारनाथ बॅनर्जीचं ग्राफिक नोव्हेल. दोआब म्हणजे 2 नद्या, हा मुळातला पर्शियन शब्द हे माहीत नव्हतं. गंगा जमुनाचा प्रदेश दोआब हेच आधीपासून वाचल्याने हा हिंदी शब्द आपल्याच संस्कृतीतला असा समज झालेला. ग्राफिक नोव्हेल मध्ये टेक्स्ट आणि इमेजेस दोन्ही दोन नद्यांच्या संगमा।सारखी एकत्र येतात वगैरे अर्थाने फक्त हे नाव नाही. नसावं. ग्राफिक नोव्हेल्स मला एकेकाळी अजिबात आवडायची नाहीत, पण आता काही फार इंटरेस्टिंग वाटायला लागली आहेत. शब्दांचा विचार व्हिज्युअली करत जाणं, स्टोरीलाईन चित्रांमधून पुढे नेणं आवडतं आता खूप, मे बी वॉटर कलर्स आणि स्केचिंग स्वतः करायला लागल्यापासून. दोआब दिलचा प्लॉट फार आवडला. सारनाथ बॅनर्जीला फिक्शन फक्त वाचायला आवडायचं आणि नंतर त्याला नॉन फिक्शन आवडायला लागली. त्याला आवडलेलया पुस्तकांबद्दल त्याने व्हिज्युअली एक्स्प्रेस केलं आहे. अर्थात अजून पुस्तक वाचायला किंवा वाचा-बघायला सुरुवात नाही केलेली, पण प्रस्तावना वाचून ते आवडणार हे लक्षात आलं. मलाही आता नॉन फिक्शन आवडतात, त्याची सुरुवात नेमकी कधी झाली? काही वर्षे तरी झाली. अर्थात ट्रॅव्हल फिक्शन आवडायचं तेव्हाच ट्रॅव्हलिंग वरचं ...
12 March
- Get link
- X
- Other Apps
रोज एक पोस्ट लिहेन म्हटलं होतं पण ते काही झालं नाहीच. त्यामुळे बराच मोठा ब्रेक गेला. किडनी स्टोन दुखण्याने त्रस्त आहे. प्रचंड दुखतं आहे त्यामुळे सध्या भरपूर पाणी पिणे आणी वारंवार शू ला जाणे हेच एकमेव काम. लेखनामध्ये फारशी काही प्रगती नाही. एक कथा लिहायची डोक्यात आहे पण त्याला मूड येत नाहिये. आज उद्या सुट्टी असल्याने जर जमलं तर लिहिणार आहे. बघू.
- Get link
- X
- Other Apps
माझं जुनं आयडिया जर्नल/नोटबुक आता भरलं म्हणून नवं करायला घेतलं. त्या आधी जस्ट एक आढावा घेतला आणि इतक्या सुंदर आयडियाज- लेख/कथा/कादंबरी/ब्लॉग/वेबिनार/वर्कशॉप?आर्ट/बिझनेस/होम डेकॉर/अपसायकलिंग आणि अशा अनेक कॅटगरीज.. त्यातल्या दहा टक्के सुद्धा प्रत्यक्षात आणलेल्या नाहीत, किंवा त्या दृष्टीने प्रयत्न केलेले नाहीत. पण हल्ली मी ऑप्टीमलिस्ट मोडमधे असल्याने त्यामुळे एरवीसारखी फ़्रस्ट्रेट किंवा डिप्रेस्ड वगैरे झाले नाही. पण कुतूहल म्हणून रेडिट/क्वोरा वर गेले त्याकरता तर माझ्या प्रश्नाचे ऑलरेडी अनेक थ्रेड्स तिथे आहेत हे बघून जाम मजा वाटली. त्यावरची उत्तरं काही मनोरंजक, सुपर प्रॉडक्टीव लोकांकडून आलेली, तर काही खरोखर विचारात पाडणारी आणि पॉझिटीव आहेत मात्र. मिडियम सारख्या साईटवर अशा टॉपिक्सवर लोक लगेच आर्टिकल्स लिहितात आणि त्यांना किमान ३०० प्लस डॉलर्स मानधन मिळतं. काश इंग्लिश मधे लेख लिहायची प्रॅक्टीस ठेवली असती.
आर्तेमिसिया
- Get link
- X
- Other Apps
खूप उशिरा उठले, कामांचा आढावा घेतला आणि टेन्शनच आलं. पण मग चहा घेतला, आर्यभवन मधून उपमा मागवला आणि वॉटर कलर करायला घेतलं. झाडांची सिरीज, काही नुसत्याच ब्रश आडवा करून लांब पाकळ्या एका मागोमाग एक. वेगवेगळे पोत आणि छटा. पाठीला रग लागल्यावर उठले आणि भरपूर गरम पाण्याने आंघोळ केली. स्वयंपाक केला आणि आता लोळत पडले. चार वाजता उठून काय ते कामाच्या यादीकडे बघणार. मंजिरी आणि मी बारा मास पेंटिंग्जवर काही लेक्चर प्रेझेंटेशन करायचं प्लॅन करतोय त्यावर विचार करणार. आज walk ला जाणार, गेले 2 दिवस बुट्टी झाली. कालच्या प्रेझेंटेशनने फार थकवलं. खूप मोठा टाइम span झाला त्यामुळे त्यात फेरी मारून आल्यासारखाच थकवा आला. आर्तेमिसिया वर काहीतरी दीर्घ करणं मस्ट आहे, फार चालते9आहे मनात येऊन.
- Get link
- X
- Other Apps
गेले काही दिवस कुत्रा कामात जाताहेत. मध्ये ऑलिम्पिया मुळे 3,4 दिवस असेच गेले ते महागात पडताहेत. पण मला कथा लिहून झाल्यावर जो काही सुकून मिळाला आहे! अर्धवट कथांची संख्या बघता आता माझ्याच्याने पूर्ण लिहून होणारच नाही असं वाटायला लागलं होतं. कथा वंदनाला पाठवल्यावर तिचा दोन दिवसांनीं खुश होऊन फोन आला मग आम्ही जनरलीच आजच्या कथा, भारत सासणे, सानिया आणि बाकी न आवडणाऱ्या कथा वगैरेवर भरपूर बोललो. योजना आणि वंदना किंवा स्नेहा यांच्याशी बोलून झाल्यावर आजच्या कंटेम्पररी साहित्याशी कनेक्टेड झाल्यासारख वाटतं. म्युझियमचं काम कधी संपणार कळत नाहीये. लांबत चाललं आहे. त्यात वर्कशॉप तयारीही आहे. पण यावेळी मी शक्यतो शेड्युल डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घेत आहे, पण ते होत राहतं, वाटेल ते खाल्लं जातं, चालणं बुडतं. काल शेवटी काम बंद करून जरा स्केचिंग केलं. वॉटर कलरचा पसारा काढायची हिम्मत नाही झाली. पार्लरला जाऊन हेड मसाज घेऊन आले, सायली आज जयपूरला जाणार म्हणून वाघ बकरीलाही गेले. ती येईल तेव्हा मी ठाण्याला असेन. बहुतेक. काल प्रवासाचे नवे प्लॅन, हिमाचल की कलिंपोंग वगैरेवर मिथिलाशी बोलतानाही इतकं गा...
लयीची किल्ली
- Get link
- X
- Other Apps
वॉटर कलर्स किंवा स्केचिंग करताना एक गोष्ट लक्षात आली की यात तंद्री फार पटकन लागते. फोकस फिजिकली हातातल्या ब्रश, रंग किंवा पेन्सिलवर केंद्रित करायला लागत असल्याने ही तंद्री किंवा एकाग्रता पटकन साधली जाते. आणि मग -हीदम आपोआप मिळतो. काम पूर्ण झाल्याशिवाय तंद्री मोडत नाही. मग लिहिण्याच्या प्रक्रियेत ही तंद्री, फोकस, -हीदम साध्य करायला इतका वेळ, इतके श्रम का लागतात? कालची कथा लिहीत असतानाही हाच अनुभव आला की अगदी शेवटच्या टप्प्यात आल्यावर तंद्री, लय मिळाली. लय मिळणं महत्वाच आहे शेवटी. ही लय सुरुवातीपासून लिहिण्यात आणता का येत नाही? मुख्य कारण हेच असावं की लिहिताना मन इथे तिथे धावत राहातं, या कामावर, त्या कामावर. फेसबुक बंद केलं तरी मनाला पळण्याकरता इतर असंख्य दारं उघडी ठेवलेली असतात. फिजिकल फोकस अशक्य होऊन बसतो अनेकदा. किंवा मी ते अशक्य करते. मल्टीटास्किंगची लागलेली सवय, हातात घेतलेले अनेक प्रोजेक्ट्स हे माझं जुनं दुखणं आहे. पण त्यातूनच मार्ग काढायला हवा. वॉटर कलर्स, स्केचिंगचा फायदा होतो आहे याकरता हे लक्षात आलं या कथेच्या वेळी अचानक. लिहिण्यात सुरुवातीपासून -हीदम किंवा लय आणण्याचीही काही ट...
भोपळ्याच्या वेलावरून चंद्रावर
- Get link
- X
- Other Apps
काल झोपेतही ब्रेन सुपर ऍक्टिव्ह होता त्यामुळे गाढ अशी झोपच लागली नाही. सतत आजच्या कामांचे, कालच्या कथेचे, बाहेर जायचं राहून गेल्याचे, ठाण्याला जायच्या प्लॅनचे विचार डोक्यात येत जात राहिले. पहाटे जरा झोप लागली आणि सुपरडेलीची अंडी, ब्रेड डिलव्हरी. मग बिगबास्केटची super early स्लॉट वाली डिलिव्हरी हजर. मागवलेले 50 आयटमस, त्याचा प्रत्येक आयटम मोजून घ्यायचा आग्रह. पनीर, बटर, चीज, मश्रुम आणि असलंच सगळं फ्रीजमध्ये ढकलण्यात झोपेचं खोबरं. आज खरं तर पार्लरमध्ये हेड मसाज, पेडीची अपॉइंटमेंट घेतली आहे, पण काम इतकं आहे की बाहेर जाताच यायचं नाही. ठरवलं होतं की इथे पुन्हा कामाच्या, ते होत नसल्याच्या रडगाण्याची रेकॉर्ड लावायची नाही. पण जाऊदे आता. कुंडीत टाकलेल्या भोपळ्याच्या बियांचे इतकी फेरोशियस वाढ झालीय दोन दिवसात गेल्या. मला ती गोष्ट आठवली. वेल भराभर वाढत चंद्रापर्यंत पोचतो आणि मग तो मुलगा वर वर चढत जातो, वाटेत त्याला कोण कोण भेटतात, किडे, पक्षी, चांदण्या, ढग, हरवलेले पतंग असं. नंतर आठवत नाही. गोकर्ण मात्र नाजूकपणे वाढतेय.
- Get link
- X
- Other Apps
कालचा दिवस अमित दत्तांच्या नावाने. किरण नादर म्युझियमने त्यांच्या सगळ्या फ़िल्म्स व्हिमिओवर टाकल्या होत्या. एखाद्या विषयाचा ध्यास घेऊन फ़क्त आणि फ़क्त कलात्मकता आणि संशोधन हा निकष लावून बनवलेल्या पहाडी मिनिएचर्सच्या कला-परंपरेचा मागोवा घेणा-या फ़िल्म्स. त्यातली नैनसुख पाहिली होती. पण गीत-गोविंद, म्युझियम ऑफ़ इमॅजिनेशन्स, फ़िल्ड ट्रीप, चित्रशाला, सीन्स फ़्रॉम अ स्केचबुक, ड्रॉन फ़्रॉम ड्रीम्स, द गेम ऑफ़ शिफ़्टींग मिरर्स, द अननोन क्राफ़्ट्समन इतक्या काल पाहिल्या. जनगढ सिंग श्याम वरची बघायची होती, पण डोळे दुखायला लागले. आपल्याला जे आणि जसं करावसं वाटतं तसं, त्याच इन्टेन्सिटीने करणारा कोणी असेल तर तो आपला बिछडा हुआ सोलमेट असतो. अमित दत्ता तसा माझा सोलमेट आहे. कधीतरी हिमाचल प्रदेशात जाऊन तो रहातो तिथे महिनाभर रहाणार आहे. त्याच्या सोबत गुलेरला जाणार आहे. तो जसा फ़िल्म्स बनवतो, तसे एस्सेज, लेख लिहिणार आहे. दिवसा पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात, निदान माझी. एमेन. अमित दत्तांच्या फ़िल्म्समधे झोकुन देण्याच्या आधी एक आत्मशोधाचा अनुभव आला काल सकाळी सकाळी. तोही नोंदवून ठेवायलाच हवा. तुम्ही संवाद, भेटी कमी के...
- Get link
- X
- Other Apps
ठाण्याला एक मार्चला जायचं असं ठरवलं होतं आणि इथल्या कामांच्या रांगेत ते निदान अजून चारेक दिवस शक्य नाही लक्षात आल्यावर सकाळपासून उगाच अशक्य चिडचिड सुरु झाली. खरं तर काहीच गरज नाही, असं कितीतरी वेळा जाणं येणं मागे पुढे होतं, पण आता झाली कारण स्वत:च्या स्पेसची, रायटींग स्पेसची, स्टुडिओ स्पेसची नितांत वाढलेली गरज. अशा जागेचा होत असलेला उपयोग लक्षात आल्यामुळे अक्षरश: ओढ लागते जायची. चार-पाच दिवस सलग रहायला मिळालं तरी निवांत वाटतं. खरं तर हीच कामं, म्हणजे घरातली नाही, लिहिण्याची मी तिथे करते, पण तिथे करताना ती सहज होतात. राजेन्द्र यादव आणि मन्नू भंडारीच्या एक इम्च मुस्कान मधे राजेन्द्र फ़िक्शन लिहायला पहाडांवर जायचे आणि मन्नूना घराच्या जबाबदारीमुळे जाता यायचं नाही. त्यामुळे एकदा त्यांनी घराच्या माळ्यावर टेबल टाकलं, अर्धं छप्पर काढलं आणि मोकळ्या हवेत, बरसातीच्या जागेत त्या लिहायला बसल्या. त्या म्हणतात, खरं तर आख्ख घर रिकामं असायचं, राजेन्द्र गेले की किचनमधेही काम नसायचं. वेळच वेळ. पण मन घराच्या पसा-यात निवांत होत नाही. बरसातीमधे मला मी आकाशाच्या थेट खाली, एकटी असल्याचं फ़िलिंग येतं. मला ...