माझं जुनं आयडिया
जर्नल/नोटबुक आता भरलं म्हणून नवं करायला घेतलं. त्या आधी जस्ट एक आढावा घेतला आणि
इतक्या सुंदर आयडियाज- लेख/कथा/कादंबरी/ब्लॉग/वेबिनार/वर्कशॉप?आर्ट/बिझनेस/होम
डेकॉर/अपसायकलिंग आणि अशा अनेक कॅटगरीज.. त्यातल्या दहा टक्के सुद्धा प्रत्यक्षात
आणलेल्या नाहीत, किंवा त्या दृष्टीने प्रयत्न केलेले नाहीत. पण हल्ली मी
ऑप्टीमलिस्ट मोडमधे असल्याने त्यामुळे एरवीसारखी फ़्रस्ट्रेट किंवा डिप्रेस्ड वगैरे
झाले नाही. पण कुतूहल म्हणून रेडिट/क्वोरा वर गेले त्याकरता तर माझ्या प्रश्नाचे
ऑलरेडी अनेक थ्रेड्स तिथे आहेत हे बघून जाम मजा वाटली. त्यावरची उत्तरं काही
मनोरंजक, सुपर प्रॉडक्टीव लोकांकडून आलेली, तर काही खरोखर विचारात पाडणारी आणि
पॉझिटीव आहेत मात्र. मिडियम सारख्या साईटवर अशा टॉपिक्सवर लोक लगेच आर्टिकल्स
लिहितात आणि त्यांना किमान ३०० प्लस डॉलर्स मानधन मिळतं. काश इंग्लिश मधे लेख
लिहायची प्रॅक्टीस ठेवली असती.
कालचा दिवस अमित दत्तांच्या नावाने. किरण नादर म्युझियमने त्यांच्या सगळ्या फ़िल्म्स व्हिमिओवर टाकल्या होत्या. एखाद्या विषयाचा ध्यास घेऊन फ़क्त आणि फ़क्त कलात्मकता आणि संशोधन हा निकष लावून बनवलेल्या पहाडी मिनिएचर्सच्या कला-परंपरेचा मागोवा घेणा-या फ़िल्म्स. त्यातली नैनसुख पाहिली होती. पण गीत-गोविंद, म्युझियम ऑफ़ इमॅजिनेशन्स, फ़िल्ड ट्रीप, चित्रशाला, सीन्स फ़्रॉम अ स्केचबुक, ड्रॉन फ़्रॉम ड्रीम्स, द गेम ऑफ़ शिफ़्टींग मिरर्स, द अननोन क्राफ़्ट्समन इतक्या काल पाहिल्या. जनगढ सिंग श्याम वरची बघायची होती, पण डोळे दुखायला लागले. आपल्याला जे आणि जसं करावसं वाटतं तसं, त्याच इन्टेन्सिटीने करणारा कोणी असेल तर तो आपला बिछडा हुआ सोलमेट असतो. अमित दत्ता तसा माझा सोलमेट आहे. कधीतरी हिमाचल प्रदेशात जाऊन तो रहातो तिथे महिनाभर रहाणार आहे. त्याच्या सोबत गुलेरला जाणार आहे. तो जसा फ़िल्म्स बनवतो, तसे एस्सेज, लेख लिहिणार आहे. दिवसा पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात, निदान माझी. एमेन. अमित दत्तांच्या फ़िल्म्समधे झोकुन देण्याच्या आधी एक आत्मशोधाचा अनुभव आला काल सकाळी सकाळी. तोही नोंदवून ठेवायलाच हवा. तुम्ही संवाद, भेटी कमी के...
Comments
Post a Comment