“का?”
आपण जे करत आहोत ते का
करत आहोत असा एक विचार प्रोसेस जर्नलिंग करताना सतत स्वत:ला विचारायला लागतो कारण
त्याशिवाय त्या कामा मागचं लॉजिक एक्स्प्लेन होत नाही. लार्जर थीममधे हा विचार
मनात रेंगाळत राहिला. एक्झिस्टेन्शियल थिंकिंग म्हणता येईल त्याला. आत्ता जे करत
आहे लिहिण्याशिवाय, त्यातलं बरंचसं लॉकडाऊनमधे सुरु झालं. लॉकडाऊन नसता तर ते अजून
जरा उशीरा करायला लागले असते. खरं तर हे खूप आधी सुरु करायला हवं होतं. आधी त्याची
गरज लागली नाही का? चित्रांवर लिहिताना, आपणही चित्र काढणं, झाडं वाढवण्याचे छंद
जोपासणे यातून निर्मितीच्या आनंदापेक्षा नेमकं काय अधिक मिळत आहे मला? मुळात ते
मिळावं हा हेतूच नसेल तर काय आणि का हा प्रश्न फ़िजुल आहे. जगण्याचे प्रयोग आहेत हे
फ़क्त. मी याचा विचार करते ते फ़क्त प्रोसेसमागचे लॉजिक क्लिअर असावं म्हणून. मी
जगण्याचे प्रयोग ब्लॉगवर या ज्या पोस्ट्स टाकत रहाते, त्यातून मला पूर्ण एका
वर्षाचा डेटा आर्काइव्ह करायचा आहे. का? तर त्याकरता काही प्लॅन्स डोक्यात आहेत,
पण ते पुढच्या वर्षाकरता, मे बी २०२२२ करता.
स्विटी जोशीचं प्रदर्शन
बघायला गेले होते, तेव्हा तिच्या कामाबद्दल बोलताना अपरिहार्यपणे “का?” असा प्रश्न
आलाच, मग चेतना मधे जेवायला गेलो दुपारी, तिथे शांतपणे, सविस्तर एकमेकींच्या “का?”
बद्दल चर्चा केली. स्विटी चित्र काढते आणि लिहिते-कविता करते. मी लिहिते आणि आता
वॉटर-कलर्स/स्केचींग करते. तर दोघींना हे पर्यायी एक्स्प्रेशनचं माध्यम आपापल्या
मुख्य कामात किती मदत करत आहे, करत आहे का, यावर बोललो, ते जगण्याचे प्रयोग मधे
येईल वेळ झाला की.
Comments
Post a Comment