लिहीत नसतानाच लिहिणं

रोज रात्री नाईट जर्नलमध्ये दिवसभराबद्दल लिहिताना आज मनासारखं लिहून झालं हे वाक्य फार फार क्वचित लिहिलं जातं असं  माझ्या लक्षात आलं. जे लिहायचं आहे ते अजिबातच लिहिलं नाही, लिहिण्याचा वेळ इतर गोष्टीतच घालवला अशी वाक्य जास्त वेळा दिसायला लागली तेव्हा मी या इतर गोष्टी कोणत्या त्याचा एक ट्रॅक ठेवला. म्हणजे काय करते नेमकं मी जेव्हा लिहीत नसते? हे मी नीट नोंदवलं. फेसबुकवर नसतानाची ही गोष्ट. फेसबुकवर असताना वेळ कुठे गेला सगळ्यात जास्त हे तपासायचीही गरज नसते. पण आता होती. तेव्हा लक्षात आलं की लिहायची चालढकल करताना मी रिसर्च करता मॅक्सिमम सर्फिंग करत रहाते, एकातून दुसरं, ही लिंक, ती साईट असं. मग इतरांनी काय लिहिलं ते वाचत राहाते. सहज कुतूहल त्यामागे जास्त. काही वेळा सिनेमा, युट्यूब व्हिडीओ किंवा सिरीज कॅच-अप करते, किंवा लोळते आणि खाते. एफएम चॅनेल बदलत राहते, चहा करते.
रिसर्च, इतर आर्टिकल्स वाचणे या दोन गोष्टी सोडल्या तर बाकी फालतू आहे, त्या थांबल्या तर दिवसाच्या शेवटी लिहिणं झालं नाही तरी गिल्ट येणार नाही असं काहीतरी करायला हवं असं लक्षात आलं. मग मी 3 गोष्टी केल्या.
माझं आयडिया जर्नल अगदी हाताशी ठेवलं. लिहीत नसताना मी डे ड्रीमिंग पण करत असते. प्रवासाचे विचार, घरात काय आणायचं, नवं फर्निचर, वस्तू, मेनूचे विचार, नव्या लेखांचे, अर्धवट कथांचे विचार, मैत्रिणींना कधी भेटायचं, आर्ट एक्झिबिशन राहिलेली असं काहीही त्यात असतं. तर हे मी रँडमली एका मागोमाग एक असं नोंदवायला सुरुवात केली. मग त्यात भाजी स्नॅक्स कोणते आणायचेत याचा विचार आला किंवा फेसपॅक लावायचा आहे हेही. आपोआप ते कृतीत उतरवलं जातं, आज ना उद्या.
स्केचिंग, डुडलिंग- हे पूर्वी मी हाताला येईल त्या कागद पुस्तकावर करायचे, मला ते आवडत आहे हे बरेच दिवस डोक्यात होतंच. आता ते मी प्रॉपर स्केचबुक, वॉटर कलर्स, पेन्सिल्स आणून युट्यूब वर व्हिडीओज बघून करायला लागले. आर्टिस्टस दोस्तांची मदत घेतली. त्यात बोटॅनिकल डुडल्स मला फारच आवडायला लागली. त्यातून मग आर्ट जर्नलिंगला सुरुवात केली. संध्याकाळी walk ला जाताना मोटिव्हेशन मिळाल फुलं पडलेली गोळा करून आणायचं.
तिसरी गोष्ट, ज्या वेळी मी लिहीत नाही, त्यावेळी चक्क घरातल्या काढून टाकायच्या, जास्त झालेल्या वस्तू, कपडे याचं काय काय करायचं ते नोंदवायला सुरुवात केली.मग त्याकरता व्हिडीओज बघितले तर त्यातल्या आयडियाही लिहून ठेवायला लागले. 
मायक्रोग्रीनिंग त्यातूनच सुरू झालं. घरातले साठलेले कंटेनर्स, सिरॅमिक मग, बाऊल्स याचं नेमकं काय करायचं याचा विचार करताना. या मायक्रोग्रीनिंग बद्दल नंतर.

Comments

Popular posts from this blog