दोआब दिल
सारनाथ बॅनर्जीचं ग्राफिक नोव्हेल. दोआब म्हणजे 2 नद्या, हा मुळातला पर्शियन शब्द हे माहीत नव्हतं. गंगा जमुनाचा प्रदेश दोआब हेच आधीपासून वाचल्याने हा हिंदी शब्द आपल्याच संस्कृतीतला असा समज झालेला.
ग्राफिक नोव्हेल मध्ये टेक्स्ट आणि इमेजेस दोन्ही दोन नद्यांच्या संगमा।सारखी एकत्र येतात वगैरे अर्थाने फक्त हे नाव नाही. नसावं.
ग्राफिक नोव्हेल्स मला एकेकाळी अजिबात आवडायची नाहीत, पण आता काही फार इंटरेस्टिंग वाटायला लागली आहेत. शब्दांचा विचार व्हिज्युअली करत जाणं, स्टोरीलाईन चित्रांमधून पुढे नेणं आवडतं आता खूप, मे बी वॉटर कलर्स आणि स्केचिंग स्वतः करायला लागल्यापासून. दोआब दिलचा प्लॉट फार आवडला. सारनाथ बॅनर्जीला फिक्शन फक्त वाचायला आवडायचं आणि नंतर त्याला नॉन फिक्शन आवडायला लागली. त्याला आवडलेलया पुस्तकांबद्दल त्याने व्हिज्युअली एक्स्प्रेस केलं आहे. अर्थात अजून पुस्तक वाचायला किंवा वाचा-बघायला सुरुवात नाही केलेली, पण प्रस्तावना वाचून ते आवडणार हे लक्षात आलं. मलाही आता नॉन फिक्शन आवडतात, त्याची सुरुवात नेमकी कधी झाली? काही वर्षे तरी झाली. अर्थात ट्रॅव्हल फिक्शन आवडायचं तेव्हाच ट्रॅव्हलिंग वरचं नॉन फिक्शन पण आवडायचंच, मला वाटतं रिसर्च करताना जमत गेली नॉन फिक्शन बुक्स.
पुस्तकाचा व्हिज्युअली विचार करणं गमतीशीर आहे खूप. एखादं आवडतं पुस्तक माझ्या डोळ्यासमोर कोणती व्हिज्युअल्स आणतं? रस्किन बॉण्डची पुस्तक फार स्पष्टपणे व्हिज्युएलिस्ट असतात, पण रंग टेक्स्चर्स कोणते येतात डोळ्यासमोर हे एखाद्या इतर फिक्शन किंवा नॉन फिक्शन च्या बाबतीत पाहायला हवं. सिनेस्थेशीया बद्दल वाचलं होतं त्याच्याशी समांतर आहे का हे? त्यात एखादी आठवण, भावना, गाणं वगैरे रंगात व्यक्त होतं तुमच्या मनात. त्याबद्दल लेख लिहायचा होता. व्हॅन गॉग सिनेस्थेसिस्ट होता, मुंकची स्क्रीम सिनेस्थेशीया मधूनच आली हे जास्त एक्सप्लोर व्हायला हवं. पण आवडतं पुस्तक व्हिज्युअली एक्स्प्रेस करणं हा दोआब दिलचा प्लॉट फार आकर्षक वाटला हे खरं.
काल सरिता आव्हाड यांचं हमरस्ता नाकारताना आत्मचरित्र रात्री अडीच पर्यंत वाचत होते. त्याबद्दल सविस्तर लिहायला हवं. अनेक गोष्टी आहेत.
Comments
Post a Comment