गेले काही दिवस कुत्रा कामात जाताहेत. मध्ये ऑलिम्पिया मुळे 3,4 दिवस असेच गेले ते महागात पडताहेत. पण मला कथा लिहून झाल्यावर जो काही सुकून मिळाला आहे! अर्धवट कथांची संख्या बघता आता माझ्याच्याने पूर्ण लिहून होणारच नाही असं वाटायला लागलं होतं. कथा वंदनाला पाठवल्यावर तिचा दोन दिवसांनीं खुश होऊन फोन आला मग आम्ही जनरलीच आजच्या कथा, भारत सासणे, सानिया आणि बाकी न आवडणाऱ्या कथा वगैरेवर भरपूर बोललो. योजना आणि वंदना किंवा स्नेहा यांच्याशी बोलून झाल्यावर आजच्या कंटेम्पररी साहित्याशी कनेक्टेड झाल्यासारख वाटतं.  
म्युझियमचं काम कधी संपणार कळत नाहीये. लांबत चाललं आहे. त्यात वर्कशॉप तयारीही आहे. पण यावेळी मी शक्यतो शेड्युल डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घेत आहे, पण ते होत राहतं, वाटेल ते खाल्लं जातं, चालणं बुडतं. काल शेवटी काम बंद करून जरा स्केचिंग केलं. वॉटर कलरचा पसारा काढायची हिम्मत नाही झाली. पार्लरला जाऊन हेड मसाज घेऊन आले, सायली आज जयपूरला जाणार म्हणून वाघ बकरीलाही गेले. ती येईल तेव्हा मी ठाण्याला असेन. बहुतेक. काल प्रवासाचे नवे प्लॅन, हिमाचल की कलिंपोंग वगैरेवर मिथिलाशी बोलतानाही इतकं गार वाटलं. मला एक लांबलचक प्रवास ब्रेकची नितांत गरज आहे. मोहन म्हणाला ठाण्याला जातच असतेस की. पण मला प्रवास करण्याची गरज आहे, शेकडो किमी पलीकडे जायची गरज आहे हे त्याला कळलं नाही. आता आज रविवार. कामात सुट्टी घ्यावी का विचार करतेय, पण परवडणार नाही. घरातील काम सुद्धा साठली आहेत. जाऊदे. पेपर वाचते.

Comments

Popular posts from this blog