भोपळ्याच्या वेलावरून चंद्रावर

काल झोपेतही ब्रेन सुपर ऍक्टिव्ह होता त्यामुळे गाढ अशी झोपच लागली नाही. सतत आजच्या कामांचे, कालच्या कथेचे, बाहेर जायचं राहून गेल्याचे, ठाण्याला जायच्या प्लॅनचे विचार डोक्यात येत जात राहिले. पहाटे जरा झोप लागली आणि सुपरडेलीची अंडी, ब्रेड डिलव्हरी. मग बिगबास्केटची super early स्लॉट वाली डिलिव्हरी हजर. मागवलेले 50 आयटमस, त्याचा प्रत्येक आयटम मोजून घ्यायचा आग्रह. पनीर, बटर, चीज, मश्रुम आणि असलंच सगळं फ्रीजमध्ये ढकलण्यात झोपेचं खोबरं. आज खरं तर पार्लरमध्ये हेड मसाज, पेडीची अपॉइंटमेंट घेतली आहे, पण काम इतकं आहे की बाहेर जाताच यायचं नाही. ठरवलं होतं की इथे पुन्हा कामाच्या, ते होत नसल्याच्या रडगाण्याची रेकॉर्ड लावायची नाही. पण जाऊदे आता.
कुंडीत टाकलेल्या भोपळ्याच्या बियांचे इतकी फेरोशियस वाढ झालीय दोन दिवसात गेल्या. मला ती गोष्ट आठवली. वेल भराभर वाढत चंद्रापर्यंत पोचतो आणि मग तो मुलगा वर वर चढत जातो, वाटेत त्याला कोण कोण भेटतात, किडे, पक्षी, चांदण्या, ढग, हरवलेले पतंग असं. नंतर आठवत नाही. गोकर्ण मात्र नाजूकपणे वाढतेय.

Comments

Popular posts from this blog