कभी नीम नीम
माझ्या वागण्यात कंसिस्टंसी नाही आणि मूड प्रत्येक आठवड्याला बदलतात. भरपूर भाज्या आणून हेल्दी मिल्स करणे, वेगवेगळ्या चटण्या करणे हा एक दौर झाला की मला आपला फार वेळ, एनर्जी जात आहे असं वाटून चिडचिड होते आणि हवं तर स्वतः करा, करून घ्या नाहीतर बाहेरून मागवा वर गाडी येऊन थबकते. भरपूर काम, असाईनमेंट्स घेऊन भरगच्च शेड्युल असण्यात सुख वाटतं एकेका महिन्यात, तर हातात एकही काम नको, डेडलाईन्स नकोत, निवांत फिक्शन लिहीत राहावं असं वाटतं लगेच पुढच्या महिन्यात. कधी प्रवास हवे वाटतात, कधी संध्याकाळी चालायला जाणंही संकट वाटत. खूप खरेदी, पैसे उधळणे, नव्या वस्तू, कॉस्मेटिक्स आणणे, वापरणे हा एक मूड, दुसरा मिनीमालिस्ट लाइफस्टाइलचा, कमीतकमी पैसे खर्च करण्याचा, नो मॉल व्हिजिटचा. असे असंख्य विरोधाभास माझ्या वागण्यात आहेत जे मलाही खुपतात तर इतरांना किती कठीण, विचित्र वाटत असणार हे तेच जाणो. घरच्यांबद्दल तर माझ्या अशा मुड्सना झेलण्याबबद्दल सहानुभूती वाटण्याचा आणि मग काय झालं इतकं वाटण्याचाही वेगवेगळा मौसम असतोच. मैत्रिणी सुद्धा यातून सुटत नाहीत. कधी भरभरुन भेटी, गप्पा, वाघ-बकरी, बुकक्लब नाहीतर कोणाशी संपर्क ...