जो भी है, बस येही एक पल है...

रायटींग स्टुडिओ आणि घर यामधे ये-जा करताना माझ्या नीट जोपासलेल्या मायक्रो-ग्रीन्सची वाट लागते आहे. चवळी, लसुण, अळीव तर सुकूनच गेले. हरबरा आणि लाल माठाच्या हायड्रोपोनिक्सचे पाणी न बदलल्याने ते कुजून गेले. बाकी झाडं नीट आहेत, मधुमालती, गोकर्ण, मोगरा, तुळस, पुदिना मस्त जोम धरुन आहेत. खिडकीबाहेरच्या पेल्टोफ़ोरमचं पोपटी पालवीचं कोवळं घेरेदार छत आणि आत मी लॉकडाऊनच्या काळात जोपासलेली हिरवी दुनिया. सकाळी हे बघताना झेन मिळतो. त्यात आज एक कोणी बासरीवाला कितीतरी वेळ सूर घुमवत राहिला रस्त्यावर. दिसत नव्हता, नुसतेच सूर.

सोशल मीडियापासून दूर  असतानाचे हे दिवस मला वेळेची लहान मोठी पॉकेट्स बहाल करुन जातय, कामाच्या दृष्टीने फ़ार काही ग्रेट अचिव्ह करत नाहीये, पण सुट्टीवर गेल्याचा रिलॅक्स्ड मूड मनात टिकून रहातो आहे. आज एक मोठं आर्टिकल पाठवून झाल्यावर मग कादंबरी आणि अनुवादाकडे वळणार. म्युझियम ऑफ़ गोवा करायचं आहे या महिन्यात. त्याकरता सलग आठ दिवस काढायचे आहेत महिना संपतानाचे.  

Comments

Popular posts from this blog