जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो

साडी अपसायकलिंगचं प्रोजेक्ट डोक्यातून जातही नाही आणि ते हातात घ्यायला वेळही मिळत नाही. त्यात आज क्राफ्टसव्हीलच्या समिधाशी बोलणं झालं आणि इतक्या शेकडो आयडिया तिने बोलता बोलता सहज सांगितल्या की हातातलं लिहिण्याचं कामं बाजूला ठेवून साड्यांचे फोल्डर्स उघडावेत असा मोह झाला. मला साड्यांचे ड्रेस करण्यात बिलकूल इंटरेस्ट नाही, आहेत तेच ड्रेसेस कमी करायचेत. पण स्टुडिओकरता सुंदर पडदे, क्विल्ट्स, बेडशीट्स, कुशन कव्हर्स, दागिने असं काही काही, आणि सर्वात आधी मेमरी पॅनेल्स, मिक्स मीडिया आर्टवर्क असं करायचं, करवून घ्यायचं डोक्यात आहे. हे नीट मार्गी लागलं तर कथिकच्या  'वारसा' करताही एक अपसायकलिंग रेंज डेव्हलप करता येईल. एअर ड्राय पॉटरी, रेझिन, बोटॅनिकल आर्ट, इको डाइंग, टाईल, ग्लास पेंटिंग्ज, सोप्स आणि काय काय करायचंय मला. ग्रीन गेबल्सची ऍन आणि मी यात काही फरक नाही. कल्पनेचे घोडे साता समुद्रापार दौडत न्यायचे आणि दमून जायचं. 
पण एकंदरीतच आज सकाळी इतका सलग मोकळा वेळेचा तुकडा हाताशी लागला की काहीवेळ भिरभिरलंच चक्क. फेसबुक वेळ खाणारा राक्षस आहे आणि सध्या त्याला मागच्या खोलीत डांबून टाकलाय त्यामुळे हे शक्य झालं हे तर आहेच. अजिंठ्याचं आर्टिकल पुढचे 2 दिवस मी हातही लावला नसता ते त्यामुळे मार्गी लागल ही आजच्या अर्ध्या दिवसातली मोठी आचिव्हमेंट. 

Comments

Popular posts from this blog