बस इतनी खतां है मेरी...
गेले काही दिवस मनाचा बहुतेक असावं हट्ट चालू होता की रिकाम्या वेळात जर फेसबुक नसेल तर इतर काहीही करणार नाही. जस्ट चक्कर मारून बघायचा मोह जबरदस्त होता. काय हरकत आहे, हातातलं काम तर झालय, इतर कोणतं अर्जंट महत्वाच कामही बाकी नाहीये. पण तो टाळला. आता लक्षात येतंय की अर्जंट नसलेली पण महत्वाचीच असलेली अशीही अनेक कामं आहेत जी अनेकदा केवळ सतत पुढे ढकलण्याचा कंटाळा आला किंवा लाज वाटली म्हणून कधीतरी लिस्ट मधूनच काढली गेलीत. अशी कामं एकत्र केली तर त्यांचीच पुन्हा एक मोठी लिस्ट झाली. ती शांतपणे बाजूला ठेवून दिली. जगणं म्हणजे लिस्ट संपवणे नाही हे मनाला निग्रहाने सांगितले. संपतीलच ती कामं आज ना उद्या.
काल नीरजाशी बोलताना पुन्हा लक्षात आलं, कशाला प्रत्येक आवडीची गोष्ट, क्रिएशन पैसे मिळवण्याच्या दृष्टीतूनच पाहायला हवं? लिहिण्याची कामं कमी केली, आनंदासाठी लिहायचं ठरवलं, फिक्शन लिहायचं जास्त तर आता पैसे मिळणार नाहीत हे माहीत आहेच ना. मग कशाला पॅरलाल इन्कम सोर्स शोधायचा प्रयत्न?
परवा टाऊनला जायचं आहे. एक्झिबिशन कॅचअप्स.
जळगावच्या राजू बाविस्करांचा फोन आला होता. त्यांचा तिथला परिवर्तन ग्रुप चित्रकला-साहित्य-नाटक असं सगळं एकत्रित करून कलेची जाण वाढावी याकरता गेली 10 वर्ष सातत्याने प्रयत्न, प्रयोग करत आहेत. आता स्थानिक नव्या जुन्या चित्रकारांना घेऊन ब्लॅक अँड व्हाइट थीमवर चित्र प्रदर्शन भरवलं आहे. स्टेजवरचा अंधार आणि उजेड यांच्या खेळाचीही संकल्पना त्यात आहे. आर्ट रिडींग करणार आहेत. मी त्यावर लिहावं असं त्यांना वाटत आहे. मला त्या ग्रुपचं कौतुक वाटतं. इतर ठिकाणी रिएलिझम पोर्ट्रेटस बाहेर चित्रकला अजूनही जात नसताना हे सातत्याने कलेची अनवट वाट धरतात. नक्की लिहिणार. आर्ट बिर्ट सुरू करायला हवं.
Comments
Post a Comment