खुल जा सिम सिम...

आज दागिने आवरायला काढलेसोन्याचे नाहीतअसेचचांदीबिड्स वगैरे वगैरे.

फ्रस्ट्रेशन येणार होतंच. ते आलं.

ते येण्याची सुरुवात पुस्तकं आवरतानाच झाली.

त्यांची ती अगणित खोकी भरत जाताना पाहणं.. जाऊदे.

मग कपडेभांडी...

आपण गोष्टी का जमवतो हा एक नैराश्याच्या काळोखात नेणारा विषय आहे. माझ्या मिनीमालिझमचा वाजलेला बोऱ्या मांडायचा आहेचत्याकरता फोटो डॉक्युमेंट कर आहे व्यवस्थित.

बाकी आपण तीसेक वर्ष मांडलेलं घर रिकामं करून काही काळाकरता का होईना बाहेर पडण्याचादुसऱ्या शहरात जाण्याची तयारी करण्याचा अनुभव मानसिक दृष्ट्या इतका विदारक ठरेल असं मलाही वाटलं नव्हतं.

पुन्हा येऊ याच जागीपण ते घर हे घर नसणार.

-

अक्षय्य तृतियेच्या मुहूर्तावर काही तरी नवी सुरुवात करायला हवीखरं तर आज घराचं शिफ़्टींग पूर्ण करुन ठाण्याला रहायचा मुहूर्त करायला हवा होतातो काही पॅकिंग संपतच नसल्याने झाला नाहीपण म्हणून इथेया माझ्या व्हर्च्युअल घरात पुन्हा परतायचं ठरवलं.

Comments

Popular posts from this blog