स्प्रिन्ग कॅनॉट बी कॅन्सल्ड

मंदार पुरंदरेनी डेव्हिड हॉकनी या ब्रिटिश अमेरिकन पॉप आर्टिस्टच्या मुलाखतीची एक लिंक दिली होती. हॉकनीने गेल्या लॉकडाऊनमधे एक सिरिज केली होती स्प्रिन्ग कॅननॉट बी कॅन्सल्ड. त्यावर आधारीत घेतलेली ही मुलाखत. ती ऐकून मी प्रचंड इम्प्रेस्ड झाले, गेले काही दिवस मोटीव्हेशनच नव्हतं कामाचं, तर त्याचा एक ट्रीगर मिळाला. त्या सिरिजच्याच नावाचं हॉकनीचं पुस्तकही आहे ते किन्डलवर मागवलं. मुलाखत ज्या लिन्कवर होती त्यावर नॉर्डिक रायटर्स आणि आर्टिस्ट्स/पेंटर्सच्या अनेक मुलाखतींचे व्हिडिओज आहेत. ते ऐकण्यात आजचा दिवस, कालची रात्र गेली. आज पुस्तक वाचेन. दुपारी अर्बन स्केचिंगची प्रॅक्टीस केली. रेन्डरिंगमधलं क्रॉस हॅचिंग टेक्निक ग्राफ़िक पेन्सनी काय सुरेख रिझल्ट देतं हे कळल्यावर त्यातच अजून काही केलं.

आणि आता प्रश्न पडतोय की लिहिणं नेमकं कधी सुरु करणार आहे मी सलग?

आत्ता संध्याकाळ इतकी छान सोनेरी दिसते आहे, पण गच्चीवर जावसं वाटत नाहीये. लिहिण्याचा मुड कसा लागेल यावर जरा विचार करते.

Comments

Popular posts from this blog