खुदपे इतराते हुए...

 जग नॉर्मलवर येत असतं. तुम्हीही त्या जगात पुन्हा मिसळून जायची मानसिक तयारी करत असता. थोडंफ़ार रुटीन व्यवहार सुरु झालेले असतातच. वर वर पहाता ठीकच आहे सगळं. पण मग तुम्हाला अचानक भिती, असुरक्षित वाटायला लागतं. जग जरा जास्तच वेगाने नॉर्मल होत आहे का? तुम्ही त्या वेगाशी जुळवून घेऊ शकणार आहात का? खूपच काळ तुटलेपण होतं या जगापासून. या नॉर्मल जगात तुम्ही आता नव्याने जाणार. किती नॉर्मल वागू शकणार आहात? आपण बाहेरच्या जगात नव्हतो, तेव्हा ते जग नेमकं कसं, किती बदललं आहे? कितपत वाईट, कितपत चांगलं, कितपत नेहमीसारखं? शिवाय जग किती कम्फ़र्टेबल आहे तुमच्याशी वागताना हे कुठे माहित आहे आता तुम्हाला? तुमचं बदलणं जगालाही नवच आहे.

रात्रीचे १०-१७

एफ़ेमवर – चांदनी रातमें एकबार तुझे देखा हैं...

Comments

Popular posts from this blog