Posts

Showing posts from May, 2021

स्प्रिन्ग कॅनॉट बी कॅन्सल्ड

मंदार पुरंदरेनी डेव्हिड हॉकनी या ब्रिटिश अमेरिकन पॉप आर्टिस्टच्या मुलाखतीची एक लिंक दिली होती. हॉकनीने गेल्या लॉकडाऊनमधे एक सिरिज केली होती स्प्रिन्ग कॅननॉट बी कॅन्सल्ड. त्यावर आधारीत घेतलेली ही मुलाखत. ती ऐकून मी प्रचंड इम्प्रेस्ड झाले, गेले काही दिवस मोटीव्हेशनच नव्हतं कामाचं, तर त्याचा एक ट्रीगर मिळाला. त्या सिरिजच्याच नावाचं हॉकनीचं पुस्तकही आहे ते किन्डलवर मागवलं. मुलाखत ज्या लिन्कवर होती त्यावर नॉर्डिक रायटर्स आणि आर्टिस्ट्स/पेंटर्सच्या अनेक मुलाखतींचे व्हिडिओज आहेत. ते ऐकण्यात आजचा दिवस, कालची रात्र गेली. आज पुस्तक वाचेन. दुपारी अर्बन स्केचिंगची प्रॅक्टीस केली. रेन्डरिंगमधलं क्रॉस हॅचिंग टेक्निक ग्राफ़िक पेन्सनी काय सुरेख रिझल्ट देतं हे कळल्यावर त्यातच अजून काही केलं. आणि आता प्रश्न पडतोय की लिहिणं नेमकं कधी सुरु करणार आहे मी सलग? आत्ता संध्याकाळ इतकी छान सोनेरी दिसते आहे, पण गच्चीवर जावसं वाटत नाहीये. लिहिण्याचा मुड कसा लागेल यावर जरा विचार करते.

विंडो नोट्स

खिडकीतून बाहेर बघताना आकाशातली घार तरंगताना दिसणं, पेल्टोफोरमची फुलं गिरक्या घेत खाली सांडताना किंवा फांदीवरून खार धावताना बघणं किंवा कावळा जवळ येऊन भांड्यातलं पाणी पिताना बघणं हे काहीच तुमच्या विचारांच्या प्रोसेस मध्ये अडथळा आणत नाही, तुमची नजर शांतपणे त्यांच्या हालचालींचा मागोवा घेते, परत येते आणि शब्दांची ओळ सलग टाइप होते हातून. नजरेच्या टप्प्यातली पण आवाज न करता त्यांचं काम शांतपणे करणारी, वावरणारी माणसंही मनातल्या विचारांचा धागा खंडित करत नाहीत. चालतानाही हेच होतं. नजर आजूबाजूचं जग टिपत राहाते आणि मेंदू त्याचं विचार करण्याचं काम करत रहातो. विविध भारतीवरची जुनी गाणी ऐकतानाही विचारांना अडथळा येत नाही. साधारणपणे एक परिचित, संथ, संवेदनांवर ओरखडा न उमटवणारी लय जर दृश्याला, आवाजाला असेल तर त्याचा अडथळा वाटत नाही. उलट तुमच्या कामात त्याची सोबत मिळते, मदतही होते.

स्टारटिंग पॉईंट न मिळणे

मे महिन्यात खूप कामं करायची आहेत. एप्रिल महिना प्रवास, vaccination, टाईमपास यात गेला त्यामुळे त्यातला बॅकलॉगही आहे. घरातही अनेक गोष्टी करायच्या राहिल्या आहेत. पण मी काहीही करत नाहीये. पसारा झाला आहे पुन्हा सगळा. कपडे, पुस्तकं हे तर नेहमीचंच, पण स्केचबुक्स, आर्ट सप्लाईज, कोलाजकरता कात्रणं, चित्र, मायक्रोग्रीनिंगचे ट्रेज, बिया, मशोबरातली फुलं सुकवायला ठेवलेली पुस्तकं, रेझिनच्या बाटल्या, मोल्डस, डायऱ्या, जर्नल्स, व्हिटामिन्सच्या बाटल्यांचे ट्रेज, गेल्यावेळी इसेनशीयल ऑईल्स घालून केलेले सोप्स मोहन-मुलींना आवडले म्हणून पुन्हा करायला मागवून ठेवलेलं मटेरियल, इको प्रिंटिंगचे स्टॅम्पस आणि त्यात माझा लिखाणाचा अमर्याद पसारा. दागिने, कॉस्मेटिक्स, साड्या, बॅग्ज, पर्सेस तर मी उल्लेखतही नाही. शिवाय याहून तिप्पट पसारा ठाण्याला स्टुडिओत. तिथल्या तर बुक शेल्फसही ओसंडत आहेत.  डी-क्लटरिंग गरजेचं आहे, पण यातलं काहीच टाकायचं सुद्धा नाहीये. यात मजा अशी की हा सगळा पसारा हलता असतो तेव्हा त्याचा ताण नसतो, त्यात मजा असते. मधेच कधीतरी वेग मंदावतो, जसा गेल्या महिन्यात. आणि मग गोष्टींवरचा फिरता हात थांबतो आणि पस...