Posts

Showing posts from January, 2021

सुहाना सफर विथ अन्नू कपूर @92.7 बिग एफएम पर

रोजचं रुटीन पार पाडतानाच सकाळी इतकी एनर्जी खर्च होते, उशिरा उठलं तर अजूनच. अनेक पुरुष लेखक किती सहजतेनं या रुतीनमधून, घराच्या आवश्यक दिनक्रमातून बाहेर पडलेले असतात. स्टीव्हन किंग, मुराकामी किंवा कोणाचेही रायटिंग रुटीन वाचताना ते सकाळी कॉफी घेतात (ऑफकोर्स ब्लॅक) आणि लिहायला बसतात, त्यांच्या शांत, सुबक रायटिंग टेबलावर. मग तीन-चार हजार शब्द लिहून झाले की ब्रेक घेतात, walk ला जातात, व्यायाम करतात. **चा*. याला म्हणतात लेखकाची दिनचर्या. इथे आमचे सतराशे साठ उद्योग सकाळपासून. पुन्हा पुन्हा जागेवरून उठायचं, अमुक करायचं, येऊन बसायचं. तू भी सून बेखबर

समांतर रस्ते

Image
वेगवेगळे ट्रॅक्स पॅरलल चालू आहेत डोक्यात. म्हणजे सकाळचे दहा वाजले आहेत, खिडकीबाहेर आडव्यातिडव्या पसरलेल्या झाडांच्या पानं गळालेल्या रिकाम्या, तपकिरी फांद्या मला नॅशनल हायवे, मग त्यातून आता फुटलेले रस्ते, त्यातल्या गल्ल्या, क्रॉसरोडस, सबवे अशा दिसत आहेत. खारी, पारवे, चिमण्या त्या रस्त्यांवरून लगबग करत आहेत. उन्हाचे कवडसे छानपैकी खिडकीच्या संगमरवरावर पसरले आहेत, मायक्रोग्रीनस कोवळेपणाने चमकताहेत, मागची इमारत तशीही शांतच असते दिवसभर. आता तर काही जिवंत अस्तित्वाच्या खुणाही नाहीत. जी काही हालचाल आहे ती त्या झाडावर. तर ही पार्श्वभूमी. त्यावर माझ्या डोक्यातले समांतर ट्रॅक्स. एकामध्ये काल आर्टबिर्ट वर्कशॉप करता लिहून ठेवलेला कंटेंट, दुसऱ्यात मॉर्निंग पेजेस लिहायची आहेत तर उघडावा का जर्नल असा नुसताच एक रिकामा विचार, त्यानंतर लगेच समांतर करडईची भाजी उकडून ठेवली आहे फ्रीजमध्ये, ताकही आहे वगैरे, एका ट्रॅकवर श्रेयुसोबत पुन्हा एक कप चहा घ्यावा का, मग त्यातून आईची आठवण. बिगबास्केट डिलिव्हरीसोबत दोन एक्झिक्युटिव्ह डेट डायऱ्या आलेल्या पाहून तिने कपाळावर मारलेला हात आणि माझ्याकडे पाहून उडवलेले खांदे मला...

जगण्याचे प्रयोग

  हा कुठलाही अधला मधला दिवस नव्हता, वर्षाचा पहिला दिवस. २०२१ साल उजाडलं. त्याहीपेक्षा २०२० संपलं याला यावेळी जास्त महत्व आलेलं. तिचा उत्साह नेहमीसारखाच. म्हणजे नव्या वर्षाच्या स्वागताचे मेसेजेस पाठवणे, पार्ट्या वगैरेबद्दल अजिबात उत्साह नाही. कोणे एके काळी तो नेमका कधी होता हेही आता आठवत नाही. उत्साह एकच, आणि तो वर्षानुवर्षे टिकून राहिलेला- प्लॅनिंग आणि रिव्ह्यू. नव्या वर्षाचे प्लॅनिंग, संपलेल्या वर्षाचा रिव्ह्यू. यावर्षी बॉवरस्पेसच्या मेक माय डे प्लॅनर डाय-यांचा पूर्ण सेट घेतला आहे, गेल्या वर्षी बुलेट जर्नलिंग करता एक एक्स्पेन्सिव लेक्तर्नमची वही आणि बाकी रायटींग, मॉर्निंग पेजेस, नाईट लॉग्ज करता, ड्रीम्स-आयडिया जर्नलकरता वेगवेगळ्या देखण्या, गुळगुळीत, उंची पानांच्या वह्या. त्यातल्या सगळ्या नाहिच वापरल्या गेल्या. पण उत्साहात कमी नाही. डाय-या-नोटबुक्स आणि प्लॅनिंग, जर्नलिंग वगैरेचं वेड नेमकं कधी लागलं तेही आठवत नाही. परवडत नव्हतं तेव्हा एकच डायरी सगळ्याकरता. त्याही आधी शाळेची असते तशी वही. पण उत्साह तोच. एवढ्या डाय-या/नोटबुक्स पूर्ण कधीच भरत नाही. अधे मधे पानं रिकामी असतात, पण...