Posts

Showing posts from May, 2022

खुल जा सिम सिम...

आज दागिने आवरायला काढले ,  सोन्याचे नाहीत ,  असेच ,  चांदी ,  बिड्स वगैरे वगैरे. फ्रस्ट्रेशन येणार होतंच. ते आलं. ते येण्याची सुरुवात पुस्तकं आवरतानाच झाली. त्यांची ती अगणित खोकी भरत जाताना पाहणं.. जाऊदे. मग कपडे ,  भांडी... आपण गोष्टी का जमवतो हा एक नैराश्याच्या काळोखात नेणारा विषय आहे. माझ्या मिनीमालिझमचा वाजलेला बोऱ्या मां डायचा आहेच ,  त्याकरता फोटो डॉक्युमेंट कर त   आहे व्यवस्थित. बाकी आपण तीसेक वर्ष मांडलेलं घर रिकामं करून काही काळाकरता का होईना बाहेर पडण्याचा ,  दुसऱ्या शहरात जाण्याची तयारी करण्याचा अनुभव मानसिक दृष्ट्या इतका विदारक ठरेल असं मलाही वाटलं नव्हतं. पुन्हा येऊ याच जागी ,  पण ते घर हे घर नसणार. - अक्षय्य तृतियेच्या मुहूर्तावर काही तरी नवी सुरुवात करायला हवी ,  खरं तर आज घराचं शिफ़्टींग पूर्ण करुन ठाण्याला रहायचा मुहूर्त करायला हवा होता ,  तो काही पॅकिंग संपतच नसल्याने झाला नाही ,  पण म्हणून इथे ,  या माझ्या व्हर्च्युअल घरात पुन्हा परतायचं ठरवलं.